गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान म्हसळा तर्फे शिवराज्याभिषेक उत्साहात साजरा 

म्हसळा : निकेश कोकचा 

दरवर्षी प्रमाणे होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा किल्ले रायगडावर गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे जेष्ठ शुद्ध त्रयोदशी दिनांक २५ जून २०१८ रोजी हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत किल्ले रायगड येथे साजरा करण्यात आला.
गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे गडावर अनेक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत असते. यावर्षी सूमारे शेकडो कार्यकर्ते म्हसळा तालुक्यांतून शिवराज्याभिषेकाला आदल्या दिवशी सकाळी गडावर गेले होते. गडावर पावसाळा असून देखील महिला, मुली व बाल यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी गड उतरताना गडावरील वाटेवर असणारा प्लास्टिक कचरा स्वच्छ करण्याचे प्रेरणादायी कार्य केले. प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी म्हसळा तालुक्यांमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. त्यामध्ये शिवजयंतीला किल्ले रायगडावरून मशालज्योत आणणे आणि शिवपालखी मिरवणूक काढणे, सायकल रँली, सार्वजनिक दहीहंडी उत्सव, मराठी राजभाषा दिन साजरा करणे, दिवाळीमध्ये किल्ले स्पर्धा तसेच रांगोळी स्पर्धा, मान्यवरांचे व्याख्यान असे अनेक उपक्रम वर्षभरात आयोजित करण्यात येत असतात.
       यासाठी गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष श्री.  सचिन करडे, कौस्तुभ करडे, राजेश करडे, युवराज करडे, शूभम करडे, अनिकेत तांबट, समृद्धी सुकाळे, माई करडे, शिवानी करडे,  प्रणय साळवी आदींनी मेहनत घेतली.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत