गलिच्छ हस्ताक्षर असलेल्या डॉक्टरांना ५ हजारांचा दंड

Related imageलखनऊ : रायगड माझा ऑनलाईन 

अनेक डॉक्टर प्रिस्किप्शनवर काय लिहतात हे फक्त त्यांना आणि औषधं देणाऱ्या दुकानदारांनाच कळू शकतं. यातील 3 डॉक्टरांना अत्यंत गलिच्छ हस्ताक्षराबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. या तिघांना प्रत्येकी ५ हजारांचा दंड ठोठावला असून उच्च न्यायालयाच्या लायब्ररीमध्ये दंडाची रक्कम जमा करावी असे आदेश देण्यात आले आहेत.

लखनऊ उच्च न्यायालयामध्ये या तीन डॉक्टरांविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. पीके गोयल हे सीतापूरच्या,डॉ.टीपी जयस्वाल उन्नावच्या आणि डॉ.आशिष सक्सेना हे गोंडा इथल्या जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. तीन वेगवेगळ्या गुन्ह्यात जखमी झालेल्यांचे वैद्यकीय अहवाल न्यायालयासमोर सादर केले असता न्यायालयाला हे अहवाल घाणेरड्या अक्षरामुळे वाचता आले नव्हते. हे अहवाल न्यायाधीशांना सोडा, वकिलांनाही वाचता आले नव्हते. डॉक्टरांच्या वकिलांनी याबाबत न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितलं की त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण असल्याने हे अहवाल त्यांनी घाईघाईत लिहले होते.

असल्या घाणेरड्या अक्षराबद्दल जबरदस्त नाराजी व्यक्त करताना उच्च न्यायालयाने राज्याच्या गृह सचिवांनाही धारेवर धरलं. यापुढे वैद्यकीय अहवाल हे सोप्या भाषेत आणि समजेल अशा सुंदर अक्षरातच लिहले गेले पाहिजेत अशी तंबी न्यायालयाने या सचिवांना दिली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत