गांधीगिरीत डॉन अरूण गवळी टॉपला!

नागपूर : रायगड माझा वृत्त 

अंडरवर्ल्ड डॉन म्हणून ओळखल्या जणाऱ्या अरुण गवळीने चक्क गांधी विचारांच्या परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला आहे. मुंबईच्या दगडी चाळीवर एकेकाळी साम्राज्य करणारा हा गुन्हेगार आज नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये आहे.

परीक्षेत कारागृहातील १६० कैदी बसले

सहयोग ट्रस्ट सर्वोद्यय आश्रम नागपूर, आणि मुंबई सर्वोद्यय आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूरच्या कारागृहातील कैद्यांसाठी  गांधी विचार परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत कारागृहातील १६० कैदी बसले होते. त्यांना अभ्यासासाठी गांधी विचारांची पुस्तकं पुरविण्यात आली. नागपूरच्या कारागृहातील अंडासेलमध्ये शिक्षा भोगणाऱ्या अरुण गवळीनंही परीक्षा दिली. त्याला पुरविलेल्या साहित्यातून गांधीजींचे विचार आत्मसात करताना परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली.

गवळीची मोठी दहशत

अरुण गवळी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून, त्याची मोठी दहशत आहे. तर गांधीजींचे विचार हे अहिंसेचे आहेत. गांधी विचारांची परीक्षा पास करणे आणि हे विचार प्रत्यक्ष आचरणात आणणे यात फरक आहे.  मात्र आता परीक्षेच्या माध्यमातून का होईना हा डॉन गांधी विचारांशी जुळला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत