गाडीच्या पेंटाग्राफला आग लागल्यानं वाशी स्थानकात घबराटीचे वातावरण

नवी मुंबई: महाराष्ट्र News 24 वृत्त 

हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात एका लोकल गाडीच्या पेंटाग्राफला आग लागल्यानं या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्रांच्या मदतीनं तात्काळ हालचाल करून आग नियंत्रणात आणली. अज्ञात व्यक्तीनं पेंटाग्राफवर ट्रॉली बॅग फेकल्यामुळं ही आग लागल्याचं आता समोर आलं आहे.

ऐन कार्यालयीन वेळेतच हा प्रकार घडल्यानं चाकरमान्यांचा चांगलाच खोळंबा झाला. या घटनेत कुणीही जखमी झालं नाही. त्यानंतर ही गाडी कारशेडकडे रवाना करण्यात आली. मात्र, तोपर्यंत हार्बर मार्गावरील अनेक गाड्या रखडल्या होत्या. सध्या या मार्गावरील गाड्या २० ते २५ मिनिटे उशिरानं धावत आहेत. आता वाहतूक सुरू झाली असली तरी ती पूर्ववत व्हायला काही वेळ लागणार आहे. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही तपासण्याचं काम सुरू आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत