गाणं गाता-गाता अरिजित शिव्या द्यायला लागला!

 रायगड माझा वृत्त |
मुंबई:

आपल्या मधाळ आवाजामुळे गायक अरिजित सिंग अनेकांना त्याच्या गायकीच्या प्रेमात पाडतो. तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या अरिजित सिंगचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. एरवी शांत असणाऱ्या अरिजितचे वेगळेच रूप या व्हिडिओत पाहायला मिळतंय. arijit

अरिजितचा हा व्हिडिओ त्याच्या काही वर्षांपूर्वीच्या एका कॉन्सर्टमधला आहे. ज्यात तो ‘रॉकस्टार’ चित्रपटातील ‘नादान परिंदे’ गाणं गात गिटार वाजवताना दिसतोय. प्रेक्षकही या गाण्याचा आनंद लुटताना दिसताहेत… पण, गाताना अचानक स्टँडवर लावलेला त्याचा माइक खाली घसरू लागतो… त्यामुळं संतापलेला अरिजित स्टेजवरूनच ओरडून, अपशब्द उच्चारत माइक ठीक करायला सांगतो. त्याचा हा रुद्रावतार पाहून लगेचच माइक व्यवस्थित केला जातो… त्यानंतर उरलेलं गाणं अरिजित पूर्ण करतो खरं, पण काहीसं घुश्श्यातच!

अरिजितच्या या व्हायरल व्हिडिओमुळे त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसलाय. अनेकांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोलदेखील केलंय. परंतु, अरिजितनं मात्र याबाबत अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत