‘गाव गाता गजाली’ ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : रायगड माझा वृत्त 

झी मराठी ही मालिका कायमच प्रेक्षकांना नवनव्या मालिकांमधून आनंद देण्याचा प्रयत्न करत असते. वाहिनीवरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला पडतात. यातीलच एक मालिका म्हणजे ‘गाव गाता गजाली’ ही मालिका अल्पावधीतच रसिकांच्या मनात घर करून गेली होती. आता पुन्हा एकदा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

गणरायाच्या आगमनाच्या दिवशी ही मालिका सुरू होणार आहे. 13 सप्टेंबरपासून बुधवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता ही मालिका असणार आहे. एका छोट्याशा ब्रेकनंतर ही मालिका पुन्हा एकदा रसिकांच मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

आम्ही लवकरच भेटीला येणार असं आश्वासन मालिकेच्या शेवटी दिले होते. आणि अगदी तो शब्द पाळून ही मंडळी आपल्या भेटीला येत आहे. या मालिकेतील नव्या भागाचे चित्रिकरण देखील कोकणातच करण्यात आले आहे. तीच कलाकार मंडळी आपल्याला पाहायला मिळणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत