गीर अभयारण्यात धोकादायक व्हायरसमुळे 11 सिंहाचा मृत्यू

अहमदाबाद : रायगड माझा ऑनलाईन 

गुजरातच्या गीर अभयारण्यामध्ये सातत्याने होणाऱ्या सिंहाच्या मृत्यूमुळे वनप्रशासन हादरून गेले आहे. सिंहासाठी प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्यात 20 सप्टेंबरपासून आतापर्यंत 11 सिंह दगावल्याच्या वृत्ताला जसाधर अॅनिमल केअर सेंटरने दुजोरा दिला आहे. तसेच एकूण 21 सिंहाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या सिंहाच्या मृत्यूमागे धोकादायक व्हायरस असल्याचे उघड झाले आहे. या व्हायरसमुळे 1994 मध्ये तंजानियात एक हजार सिंह दगावले होते.

गीरमध्ये 12 सप्टेंबरपासून सिंहाचा मृत्यू होत असल्याचे उघड झाले होते. आतापर्यंत मृत्यू झालेल्या सिंहाची संख्या 21 झाली आहे. 12 ते 19 सप्टेंबरदरम्यान डालखानिया रेंजमध्ये छाव्यांसह 11 सिंहाचा मृत्यू झाला आहे. धोकादायक व्हायरसमुळे सिंहाचा मृत्यू होत असल्याचे उघड झाल्याने वनप्रशासन हादरले आहे. 12 ते 16 सप्टेंबरदरम्यान 4 सिंहाचा कॅनाइन डिस्टेंपर व्हायरसमुळे (सीडीव्ही) मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. हा धोकादायक व्हायरस जंगली कुत्र्यांमुळे पसरतो. याच व्हायरसमुळे 1994 मध्ये तंजानियात एक हजार सिंहाचा मृत्यू झाला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या सिंहाच्या मृत्यूमुळे जगातील वन्य आणि प्राणीतज्ज्ञांमध्ये चिंता निर्माण झाली होती.

गीर अभयारण्यातील चार सिंहाचा सीडीव्ही व्हायरसमुळे मृत्यू झाल्याचे पुण्यातील नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी संस्थेच्या अहवालातून निष्पन्न झाल्याचे गुजरातचे वन आणि पर्यावरणमंत्री गणपत वासावा यांनी सांगितले. इतर सिंहाच्या मृत्यूमागील कारण समजण्यासाठी अहवालाची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मृत्यूही याच व्हायरसने झाला असेल तर तातडीने उपाययोजना करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. मृत्यूमुखी पडलेल्या 21 सिंहापैकी 6 सिंहाचा मृत्यू प्रोटोझोवा संक्रमणामुळे तर चार सिंहाचा मृत्यू सीडीव्ही व्हायरसमुळे झाल्याचे वन प्रशासनाने सांगितले. हा व्हायरस जंगली कुत्र्यांमुळे, जनावरे आणि चाऱ्यातून पसरतो. सुरक्षेसाठी वन विभागाने सेमरेडी भागातील सरसियामधून 31 सिंहाना जामवाला बचाव आणि उपचार केंद्रात हलवले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत