गुगल असिस्टंस मराठीतूनही…

नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन 

गुगल फॉर इंडियाच्या चौथ्या भागाचे आज अनावरण करण्यात आले. यावेळी गुगल इंडियाने भारतात भविष्यातील योजनांची घोषणा केली. यामध्ये गुगल सर्च, मॅपसह पेमेंट सिस्टिमचीही सेवा पुरविणार आहे. गुगलचे वरिष्ठ अभियांत्रिकी संचालक प्रवीर गुप्ता यांनी गूगल असिस्टंस आता मराठी भाषेलाही सपोर्ट करणार असल्याचे सांगितले.

Google जरी सर्वात मोठे आणि प्रसिद्ध सर्चइंजिन असले तरीही या कंपनीला अनेक बाबतीत यश मिळालेले नाही. मेसेंजरसारख्या सुविधा न चालल्याने त्या बंद कराव्या लागल्या होत्या. आता गुगल आणखी काही ग्राहकांभिमुख सेवा आणत आहे. Google असिस्टंस लवकरच अन्य 7 स्थानिक भाषांमध्ये  येणार आहे. एवढेच नाही तर Google असिस्टंसवर ट्रेनचे लोकेशनही समजणार आहे. तसेच गुगलने तेज अॅपचे नाव बदलून गुगल पे ठेवले आहे. या अॅपची डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या 5 कोटींवर गेल्याचा दावा गुगलने नुकताच केला होता. या कार्यक्रमानंतर गुगल मॅप आणि असिस्टंसमध्ये काही नवे फिचर वाढण्याची शक्यता आहे.

गुगलचे विक्री विभागाचे उपाध्यक्ष राजन आनंद यांनी सांगितले की, भारतात यावेळी 40 कोटी इंटरनेट वापरणारे आहेत. यामध्ये 45 टक्के महिला आहेत. यामुळे गुगलला मोठी संधी आहे. भारतात व्हाईस सर्चकरणाऱ्यांमध्ये 270 पटींनी वाढ झाली आहे. पुढील दोन वर्षांत आणखी 10 कोटी इंटरनेट वापरणारे वाढविण्याचे आमचे लक्ष्य आहे. यामुळे अन्य भारतीय भाषांमधून सुविधा देण्यात येणार आहे.

सर्च करणारे 50 टक्क्यांनी वाढले
भारतात कोणतीही गोष्ट शोधायची म्हटली की गुगलवर सर्च केले जाते. गेल्या 12 महिन्यांमध्ये प्रत्येक दिवशी 50 टक्के जादा युजर्स काही ना काही शोधत असतात.

‘नवलेखा’ ची सुरुवात
गुगलने या कार्यक्रमामध्ये ”प्रोजेक्ट नवलेखा”ची सुरुवात केली आहे. या अंतर्गत आता प्रकाशक त्यांच्याकडील माहिती ऑनलाईन टाकू शकणार आहेत .या व्दारे देशातील 1.35 लाख प्रकाशकांना डिजिटाईज्ड केले जाणार आहे.

अँड्रॉईड गो’ येणार 
गुगलच्या अँड्रॉइड गो या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणारे यंदा 400हून जास्त फोन लाँच होणार आहेत. सॅमसंग कंपनीचा J2 कोअर हा पहिला फोन असणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत