गुजरातच्या सुरक्षेत वाढ; सागरी सुरक्षेसाठी 8 जहाजांचा ताफा तैनात

अहमदाबाद : रायगड माझा वृत्त

मंगळवारी भारताच्या हवाई दलाने पाकव्याप्त कश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदचे तळंच उडवले. यात 300 ते 350 दहशतवादी ठार झाले आहेत. यामुळे घाबरगुंडी उडालेल्या पाकिस्तानने भारत-पाकिस्तान सीमेवर सैन्यांची जमवाजमव करण्याबरोबरच रणगाडेही तैनात करण्यास सुरुवात केली आहे. गुजरातमधील पोरबंदर पाकिस्तानच्या कराची या शहरापासून 281 नॉटीकल मैल दूर आहे. हे बंदर पाकड्यांच्या निशाण्यावर आहे. यामुळे या बंदरावर नौदल विशेष नजर ठेऊन आहे. या भागातील 11 ठिकाणे संवेदनशील असल्याने येथे हायअलर्ट जारी करण्याबरोबरच येथील समुद्री सुरक्षेसाठी 8 जहाजांचा ताफा तयार ठेवण्यात आले आहे. आवश्य कागदपत्रांशिवाय मच्छिमारांना सुमद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताच्या हवाईदलाने मंगळवारी पाकिस्तानमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ नेस्तनाबूत केल्याने पाकडे चवताळले आहेत. या एअर स्ट्राईकचा सूड उगवणार अशी धमकी पाकिस्तानने भारताला दिली आहे. यापार्श्वभूमीवर देशातील काही महत्वाच्या शहरांमध्ये बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. गुजरातही पाकड्यांच्या निशाण्यावर असल्याने तेथील सागरी सुरक्षेसाठी 8 लढाऊ जहाजांचा ताफाही तैनात करण्यात आला आहे. तसेच या भागातील भारत-पाकिस्तान सीमा रेषा पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे.

दरम्यान, 7 सप्टेंबर 1965 साली मध्यरात्री पाच पाकड्यांनी याच भागात घुसखोरी करत द्वारका येथे बेछूट गोळीबार केला होता. या घटनेच्या आठवड्यापूर्वी पाकिस्तानी सैनिकांनी ‘ऑपरेशन ग्रॅड स्लॅम’ नावाने आंतरराष्ट्रीय सीमेवर आक्रमक सैन्य अभियान राबवले होते. दोन्ही देशांत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पाकिस्तानी नौदल युद्धाच्याच रोषात वावरत होते. त्यानंतर पाकिस्तानच्या लढाऊ जहाजांनी गुजरातच्या किनाऱ्यावर 50 तोफगोळे डागले होते. यास पाकिस्तानने ‘ऑपरेशन व्दारका ‘असे नाव दिले होते. गुजरातच्या समुद्र किनाऱ्यानर नजर ठेवून असणारे रडार नेस्तनाबूत करण्याचा पाकिस्तानचा डाव होता. मात्र भारताच्या हवाई हल्ल्यांना घाबरून पाकड्यांनी तिथून पळ काढला होता. पण आता याच घटनेची पुनर्वृत्ती पाकिस्तान करू शकतो अशी शक्यता असल्याने गुजरातच्या समुद्री रक्षणासाठी लढाऊ जहाज तयार ठेवण्यात आली आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत