गुजराती माणूस किती हुशार आहे ते आता कळतं आहे: राज ठाकरे

मुंबई : रायगड माझा वृत्त 
Image result for raj thakre

मोदीमुक्त भारताची घोषणा करणारे व अधूनमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे मोदींवर टीका केली. ‘गुजराती माणूस किती हुशार आहे ते आता कळतं आहे,’ असा चिमटा राज यांनी काढला.

वृत्तपत्र विक्रेत्यांकडून आयोजित ‘मी उद्योजक होणारच’ या कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. राज ठाकरे आणि शिवसेना नेते मनोहर जोशी हे यानिमित्तानं एकाच व्यासपीठावर आले होते. या दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. कार्यक्रमाला उशिरा आलेल्या राज ठाकरे यांना मनोहर जोशी यांनी टोला लगावला, तर पुस्तक वाचून कोणालाही धंदा करता येत नाही. ज्यांना कामधंदा नाही ते पुस्तके काढतात’, असा टोला राज यांनी जोशींना हाणला.

‘मराठी माणूस मागे आहे हा भ्रम डोक्यातून काढून टाका. सर्वच मारवाडी, गुजराती माणसांनी दुकाने टाकलेली नाहीत,’ याकडं त्यांनी लक्ष वेधले. ‘मराठी लोकांनी आणि महाराष्ट्रानं पोषक वातावरण तयार केलं म्हणून मारवाडमधील लोक व्यवसायासाठी महाराष्ट्रात आले आहेत’, असंही राज म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत