गुन्हे शाखेतील कर्मचारी आता आयुक्तांच्या नजरकैदेत

पिंपरी: रायगड माझा वृत्त 

बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी तत्काळ हजर राहण्याचे आदेश पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिले आहेत. तसेच अनेक उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुख्यालयातील काही अधिकाऱ्यांची पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.गुन्हे शाखेतील कर्मचारी आता आयुक्तांच्या नजरकैदेत राहणार आहेत, म्हणजेच त्यांच्या नियुक्त्या मुख्यालयात असणार आहेत. फक्त दहा कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे. मुख्यालयात असणाऱ्या अधिकाऱ्यांना आयुक्तांच्या मर्जीमुळे स्वतंत्र पोलीस ठाणे मिळाल्याची चर्चा आहे.

Crime Branch officers in under watch of police commissioner | गुन्हे शाखेचे कर्मचारी राहणार पोलीस आयुक्तांच्या ‘नजरकैदेत’

गुन्हे शाखेतून बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव (कंसात कोठून कोठे) :  संपत निकम (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), दादाभाऊ पवार (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), तुषार शेटे (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), मंहमद नदाफ (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), नितीन बहिरट (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), चेतन मुंढे (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), महादेव जावळे (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), प्रमोद वेताळ (गुन्हे शाखा युनिट १ ते मुख्यालय), प्रमोद हिरळकर (गुन्हे शाखा युनिट ते मुख्यालय), सुनील चौधरी (गुन्हे शाखा युनिट १ ते मुख्यालय), के. आर. आरुटे (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), प्रवीण दळे (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय), हजरतअली पठाण (गुन्हे शाखा युनिट २ ते मुख्यालय). बदली झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकांचे नाव (कंसात कोठून कोठे) : सुधीर अर्जुन चव्हाण (नियंत्रण कक्ष ते पिंपरी पोलीस ठाणे), गणेश जयसिंग धामणे (नियंत्रण कक्ष ते चाकण पोलीस ठाणे), आर. एम. गिरी (दिघी पोलीस ठाणे ते वाहतूक शाखा), अविनाश एकनाथ पवार (नियंत्रण कक्ष ते वाकड पोलीस ठाणे), विजय पांडुरंग गरुड (नियंत्रण कक्ष ते पिंपरी पोलीस ठाणे), प्रमोद क्षीरसागर (तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे ते म्हाळुंगे चौकी).
….

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत