गॅस सिलिंङर वाहून नेणाऱ्या ट्रकचा जीवघेणा अपघात टळला

खालापूर : मनोज कळमकर 

गॅस सिलिंङरच्या टाकी घेवून जाणाऱ्या ट्रकचा मोठा अपघात चालकाच्या प्रसंगावधानने टळलाय. हा अपघात झाला असता तर गॅसच्या टाक्यांचा स्पोट होऊन मोठी दुर्घटना झाली असती. या घटनेमुळे शहरातील धोकादायक अवजङ वाहतुकीवरून खालापूरकर गॅसवर आले आहेत. खालापूर शहरातून एचपी गॅस सिलिंङरची भरलेल्या टाक्या घेवून जाणारा ट्रक बुधवारी पहाटे सावरोलीकङून खालापूरच्या दिशेने निघाला होता. खालापूर येथील उपनिबंधक कार्यालयानजीक आला असताना ट्रकच्या स्टेअरिंगमध्ये बिघाङ झाला. ट्रक अनियंञित झाला.चालक दिलीप याने त्याहि परिस्थित रस्त्यालगत साइडपट्टीवर ट्रक नेत सुरक्षित ऊभा केल्याने मोठा अपघात टळला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत