गेली १४ वर्षे कोमात असणाऱ्या महिलेने दिला मुलाला जन्म

फीनिक्स : रायगड माझा ऑनलाईन

अमेरिकेतील एका राज्यात धक्कादायक घटना घडली. गेली १४ वर्षे कोमात असणाऱ्या महिलेने मुलाला जन्म दिला आहे. हे ऐकताच, वाचताच तुम्ही देखील संभ्रमात पडाल. पण ही घटना जितकी आचंबीत करणारी आहे तितकीच हृदयद्रावक आहे.

ॲरोझोना राज्यात हसिंडा हेल्थ केअरमध्ये ही घटना घडली आहे. ब्रेन डॅमेजमुळे त्या महिलेला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या १४ वर्षापासून ती कोमात आहे. अशा स्थितीतही तिने २९ डिसेंबरला मुलाला जन्म दिला आहे. यासंदर्भात महिलेची तपासणी केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला असल्याचे उघडकीस आले.

या घटनेनंतर रूग्णालयातील महिला रुग्णांच्या विभागात केवळ महिला कर्मचाऱ्यांनच प्रवेश देण्यात येणार आहे, असा नवा नियम केला आहे. रूग्णांच्या सुरक्षेच्याबाबतीत खूप काळजी घेतली जाते. तसेच ज्या विभागात रूग्ण आहेत तेथे कर्मचारी काळजीपूर्वक लक्ष ठेवत असतात, असा दावा रूग्णालयाने केला आहे.

रूग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, महिलेसंदर्भात घडलेल्या घटनेवर कायद्याअंतर्गत तपासणी सुरू आहे. यापूर्वीदेखील २०१३ मध्ये याच रूग्णालयात अशीच घटना घडली होती. त्या घटनेप्रकरणी एका कर्मचाऱ्याला कामावरून कमी करण्यात आले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत