गेली 6 महिने महाराष्ट्र सदनाला सापडेना आयुक्त

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

Image result for महाराष्ट्र सदन नवी दिल्ली

महाराष्ट्राचे दिल्लीतील एकप्रकारे दूतावास असलेल्या महाराष्ट्र सदनात गेले 6 महिने निवासी आयुक्त नाही. पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल यांचा आदेश 5 महिन्यांपूर्वी काढण्यात आला होता मात्र त्यांना पाणीपुरवठा विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर यांच्या आग्रहामुळे कार्यमुक्त करण्यात आले नाही.सदनाचा कारभार आंधळं दळतंय कुत्र पीठ खातंय अशी झालीय. सदनात निवासी आयुक्त नाहीत. सध्या सरकारला याठिकाणी निवासी आयुक्त नावाचे पद आहे या गोष्टीचा विसर पडलाय. आज सदनाला वाली नाही.
गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त हे दुसरे महत्वाचे पद देखील गेल्या 6 महिन्यापासून रिक्त आहे.या दोन्ही महत्वाच्या पदांचा
अतिरिक्त कार्यभार समीर सहाय या यापूर्वी मराठी कर्मचाऱ्यांवर अन्याय करून नोकरीतून काढून टाकण्यात आलेल्या अनेक प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या अपर निवासी आयुक्त यांच्याकडे देण्यात आला आहे. सध्या हे महाशय देखील रजेवर आहेत. या सहाय महाशयांना महाराष्ट् सदनात 5 वर्षे झाली असून मुख्यमंत्री कार्यालयातील एका बड्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने हे महाशय वादग्रस्त असून सदनात टिकून आहे व आणखी दीड वर्ष म्हणजेच साडेसहा वर्ष दिल्लीत महाराष्ट्र सदनात काढून येथूनच सेवानिवृत्त व्हायचे आहे. 3 वर्ष बदलीचा कायदा या सहाय महाशयांना लागू नाही कारण
मुख्यमंत्री महोदय यांनी तात्काळ सदर बाबीत लक्ष घालून वरिष्ठ IAS अधिकारी यांची नियुक्ती करावी अन्यथा आयुक्तविना सदनाला वाली उरणार नाही. अतिरिक्त कार्यभरात सदन चालविले जात आहे हे महाराष्ट्राचे दुर्देव आहे . तत्कालीन निवासी आयुक्त
आभा शुक्लाने अनेक कर्मचाऱ्यांच्या खोट्या आरोपंखाली विभागीय चौकशा लावल्या आहेत मुख्यमंत्री महोदयाना अंधारात ठेवून शासन निर्णयांचे उल्लंघन करून निर्णय घेतले आहेत. सध्या सदनाच्या व्यवस्थापक पदावर नेमण्यात आलेले व्यवस्थापक याना नियमबाहय पदोन्नती देण्यात आली आहे. अनेक प्रकरणे वादग्रस्त स्वरूपाची आहेत व निर्णय न घेतल्यास न्यायालयात गेल्यास सदनाची पर्यायाने शासनाची नाचक्की होणारी आहे तरी मुख्यमंत्री महोदय यांनी तात्काळ वरिष्ठ दर्जाचा निवासी आयुक्त नेमावा. केवळ चल रहा है हो रहा है क्या जरुरत है यावर अवलंबून न राहता निवासी आयुक्त द्यावा. गेल्या 5 वर्षांपासून सदनात ठाण मांडून बसलेल्या सध्याचे अपर निवासी आयुक्त यांच्या विचित्र कामाच्या शैलीच्या विरोधात
सदनातील कर्मचाऱ्यांच्यात असंतोष वाढत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत