गेवराई : शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू

गेवराई: रायगड माझा  

शाळेच्या पहिल्याच दिवशी काम करत असताना हृदयविकारानेशिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील सुरळेगाव जि. प. शाळेत घडली. शरद रामनाथ काळे (३२ रा.कडा.ता.आष्टी)असे मृत शिक्षकाचे नाव आहे.

शरद काळे हे दोन वर्षांपासून गेवराई तालुक्यातील गुळज केंद्रांतर्गत सुरळेगाव येथील जि. प. शाळेत कार्यरत आहेत. या शाळेत पहिली ते आठवीपर्यंत वर्ग आहेत. शुक्रवारी सकाळी शाळेच्या पहिल्याच दिवशी कडा येथून शरद काळे हे दुचाकीवरून सुरळेगावला आले होते. शाळेत सहकारी शिक्षकाबरेाबर हसतखेळत कामकाज सुरू असताना अचानक त्यांना चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले. अन्य शिक्षकांनी त्यांना उमापूर येथील १०१ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून प्राथमिक उपचार करून गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. शाळा डिजिटल करण्यासाठी शरद काळे यांनी कष्ट घेतले होते. ते सध्या गेवराई शहरात एकटे राहत होते. शनिवार आणि रविवार दोन दिवस सुट्टी असल्याने ते काम आटपून कडा येथे आपल्या गावाकडे जाणार होते.

हृदय विकारानेच मृत्यू
शिक्षक काळे यांच्या छातीन दोन दिवसांपासून दुखत होते. परंतु त्यांनी अॅसिडिटीच्या गोळ्या घेतल्या होत्या. त्यांनी ईसीजीही काढला नव्हता. शवविच्छेदनात हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांत ब्लॉकेज दिसून आले असून त्यांचा मृत्यू हृदयविकारानेच झाेला आहे.
एस.एच.भावले, फिजीशीयन, उपजिल्हा रूग्णालय गेवराई

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत