गोंदियात बिबट्याची शिकार, नखांसाठी पंजे कापून शिकारी फरार

गोंदिया : रायगड माझा ऑनलाईन 

leopard-gondia

अवनी वाघिणीला ठार मारण्यावरून महाराष्ट्रातील वनविभागावर टीका होत असतानाच आता गोंदिया येथे एका बिबट्याला ठार मारल्याची घटना समोर आली आहे. गोंदियातील गोठणगाव येथे एक मादी बिबट मृतावस्थेत मिळाली असून तिचे पंजे कापून शिकारी पळून गेला आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून या मादी बिबटला दोन गोळ्या लागल्या आहेत. तसेच नखांसाठी म्हणून शिकाऱ्याने पंजे कापून नेले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ही घटाना रविवारी घडल्याचे समजते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत