गोकाकजवळ अपघात, सहा महिला ठार

बेळगाव : रायगड माझा ऑनलाईन 

उसाने भरून थांबलेल्या ट्रकला पाठीमागून मोटारीची जोरदार धडक बसून सहा महिला जागीच ठार झाल्या, तर दहा जण जखमी झाले आहेत. आज पहाटे गोकाक तालुक्यातील हिरे नदीजवळ हा अपघात घडला. सर्व मृत सौंदत्ती तालुक्यातील माडमगेरी व यरझरवी येथील रहिवासी आहेत. गोकाक फॉल्स येथील नात्यातील एका व्यक्तिचा अंत्यविधी आटोपून परतत येत असताना हा अपघात घडला.

मृतांमध्ये गंगव्वा हुरळी (वय ३०), काशवा खंडरी (७०), यल्लव्वा पुजारी (४५), यल्लव्वा गुंडाप्पानवर (४०), रेणुका सोपडला (३४) व  मल्लव्वा खंडरी (५०) अशी मृतांची नावे आहेत.

सौंदत्ती तालुक्यातील सुमारे पंधराहून अधिक जण बोलेरोमधून गोकाक फॉल्स येथे अंत्ययात्रेला गेले होते. अंत्ययात्रा आटोपून परतताना हिरेनंदी येथे बंद पडलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला बोलेरोची पाठीमागून जोरदार धडक बसली. यामध्ये मोटारीतील चार महिला जागीच ठार झाल्या. उर्वरित दोघींचा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असताना मृत्यू झाला, याशिवाय या घटनेत दहा जण जखमी झाले आहेत त्यांच्यावर प्राथमिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची गोकाक पोलिसांत नोंद झाली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत