गोपीनाथ मुंडेंचा परावभव करणारा ८२ वर्षाचा ‘हा’ नेता धनंजय मुंडेंसाठी गाजवणार मैदान

परळी: महाराष्ट्र News 24 वृत्त 

परळी रेणापूर मतदारसंघात स्व.गोपीनाथ मुंडेयांचा पराभव करणारी व्यक्ती आज धनंजय मुंडेच्या प्रचाराची धुरा हातात घेवून मतदारसंघ पिंजून काढत आहे. वयाच्या 82 व्या वर्षी परळी मतदारसंघात फिरणारे माजी आमदार पंडितराव दौंड हे आज मैदानात उतरले असून त्यांनी निवडणुकीसाठी कंबर कसलीय.

त्यांची परळी मतदारसंघात वेगळी ओळख आहे.1985 साली परळी रेणापूर मतदारसंघात स्व.गोपीनाथ मुंडे याना 3500 मताधिक्याने पराभूत करून त्यांनी विजय खेचून आणला होता. या मतदारसंघात दौंड यांचा खूप मोठा जनसंपर्कही आहे. त्याबरोबरच जिल्हा परिषद सर्कल आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नेटवर्क असलेले दौंड हे स्व.गोपीनाथ मुंडेचे जवळचे नातेवाईकही आहेत. त्यातच आज धनंजय मुंडे यांच्यासोबत तारणहार म्हणून फिरताहेत. वयाच्या 82व्या वर्षी धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी परळी मतदारसंघ पिंजून काढत आहेत. गावो गावी लोकांच्या गाठी भेटी घेऊन त्यांची मोर्चे बांधणी सुरु आहे. एवढेच नाही तर जुने डावपेच आखत पुन्हा एकदा नव्या तरुणांना आशीर्वाद देत नव्या नेत्यांना साथ द्या असे आवाहन करत आहेत. त्यांचा मुलगा संजय दौंड हा जिल्हा परिषद सदस्य आहे. यामुळे येत्या निवडणुकीत दौंड पिता पुत्र धनंजय मुंडेना मदतीला धावले आहेत. यामुळे सध्यातरी परळीच्या राजकारणामध्ये गरमागरम वातावरण आहे. परळीच्या या लढती मध्ये कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत