गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू संशयास्पदच : खासदार राजू शेट्टी

सांगली : रायगड माझा वृत्त

माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत मी पहिल्या दिवसापासून संशय व्यक्त केला आहे. सायबर तज्ज्ञांनी लंडन येथे पत्रकार परिषद घेऊन याला पुष्टी दिली आहे, असे मत खासदार राजू शेट्टी यांनी येथे व्यक्त केले. न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूसह मनोहर पर्रीकर यांच्याकडे संरक्षणमंत्रिपद असताना त्यांना दुर्धर आजार होणे, हे योगायोग म्हणावयाचे का? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

खासदार शेट्टी यांच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक येथे झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लंडन येथे हॅकर्सने केलेल्या समोर आणलेल्या मुद्द्याला खासदार श्री. शेट्टी यांनी पुष्टी दिली. ते म्हणाले,‘‘मी गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूबाबत यापूर्वीही शंका उपस्थित केली होती. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी कुणाला जवळ येऊ दिले नव्हते, त्यामुळे संशय बळावत आहे. या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे, मात्र सीबीआयवरही विश्वास कसा ठेवायचा? असा प्रश्न आहे. सरकारच्या हस्तक्षेपाबाबत आवाज उठवल्यानंतर न्यायाधीश लोया यांचा मृत्यू  झाला. मनोहर परीकर यांच्याकडे संरक्षणमंत्रिपद आल्यानंतर दुर्धर आजार होणे, नोटाबंदीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली आजारी पडले. त्यामुळे मनात अनेक संशय निर्माण होत आहेत,’’ असेही खासदार शेट्टी म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत