गोरेगाव रेल्वे स्थानकाबाहेरील गुरांचा बाजार हटवल्याने वाहतूककोंडी फुटणार

गोरेगाव: रायगड माझा वृत्त 

गोरेगाव रेल्वे स्टेशन पूर्वेकडील भूभाग क्रमांक-39कर असलेल्या गुरांच्या बाजारामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. विकास आराखडय़ात या जागेकर 18.30 मीटर रुंदीच्या रस्त्याचे आरक्षण पडले आहे. मात्र जागा हस्तांतरणाचा प्रश्न रखडल्याने वाहतूककोंडीत भर पडत होती.

shivsena-logo-new

गोरेगाव रेल्वे स्थानकाबाहेरील गुरांचा बाजार हटवल्याने या ठिकाणी रस्ता रुंदी करणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे गोरेगावमधील वाहतूककोंडी फुटण्यास मोठी मदत होणार आहे.  या पार्श्वभूमीवर सुधार समितीचे तत्कालीन अध्यक्ष अनंत (बाळा) नर यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक नगरसेविका साधना माने व अध्यक्ष स्थापत्य समिती उपनगरे यांच्या उपस्थितीत निर्णायक बैठक आयोजित करण्यात आली होती. शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे रस्तारुंदीकरणाचे काम मार्गी लागले आहे. या वेळी संबंधित ठिकाणची जागा पालिकेने ताब्यात घेण्याचे ठरवण्यात आले. सुधार समितीच्या बैठकीत पाठिंबा दिल्यामुळे गुरांच्या बाजाराची जागा ताब्यात घेऊन रुंदीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देत असल्याचे सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी जाहीर केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत