गोवंश मास वाहतूक प्रकरणी दोघांना अटक : २० किलो मासासहित मोटरसायकल जप्त

मुरूड : अमूलकुमार जैन

रायगड जिल्ह्यातील मुरूड येथे गोवंश मांसाची वाहतूक प्रकरणी मन्नान निसार पांगारकर (वय 25 वर्षे,राहणार-विहुर बाग, विहुर,तालुका-मुरूड) आणि जावेद हुसेन वाळवटकर (वय52वर्षे, राहणार-विहुर,तालुका मुरूड)या दोघांना अटक करून त्यांच्याकडून रु.19 हजार किमतीचे वीस किलो गोवंश मास, हिरो होंडा कंपनीची पॅशन प्रो मोटर सायकल जप्त करण्यात आली आहे.याबाबतची फिर्याद सचिन दत्तात्रेय वाणी (राहणार-मुरूड ) यांनी दिली.

याबाबतचे वृत्त असे की, मन्नान निसार पांगारकर आणि जावेद हुसेन वाळवटकर यांनी संगनमत करून गोवंश जनावराची बेकायदेशीर रित्या विनापरवाना कत्तल करून मन्नान निसार पांगारकर ह्याने त्याच्या ताब्यातील हिरो होंडा कंपनीची पॅशनप्रो मोटरसायकल क्रमांक 0519 यावरून रुपये चार हजार किमतीचे वीस किलो गोवंश जनावराचे मासाची वाहतूक करीत असताना त्याच्याकडे मिळून आले. याप्रकरणी मन्नान निसार पांगारकर आणि जावेद हुसेन वाळवटकरदोघांना अटक करून सुमारे रुपये 19000/-किमतीचे मोटर सायकल सहित मास जप्त करण्यात आले.

याप्रकरणी मुरूड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर साले हे अधिक तपास करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत