गोवा: तब्बल 40 फूटी आकाशकंदील ठरणार पर्यटकांसाठी खास आकर्षण

पणजी : रायगड माझा ऑनलाईन 

aakash-kandil-40-feet-goa

दीपावली म्हणजे दिव्यांचा उत्सव. पणत्या आणि आकाश कंदील पेटवून पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. पण यंदा गोव्यातील एक आकाश कंदील पाहण्यासाठी लोकांची उत्सुकता वाढली आहे. 40 फूटीचा हा आकाश कंदील असल्याने साऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

गोव्यात राजधानी पणजीमधील मळा भागात यूथ ऑफ पोर्ताइज मंडळाने तब्बल 40 फूटी आकाश कंदील बनवला असून आज सायंकाळ पासून सर्वांसाठी तो आकर्षण ठरणार आहे. गेले 15 दिवस मंडळाचे कार्यकर्ते त्यासाठी राबत होते. मंडळातर्फे दरवर्षी भला मोठा आकाश कंदील बनवून दिवाळी साजरी केली जाते. त्याला मिळणारा प्रतिसाद वाढतच आहे. यंदा तर मंडळाने 1 लाख खर्च करून 40 फूटी आकाश कंदील बनवला आहे. त्यासाठी अनेकांनी देणगी देऊन हातभार लावल्याने मंडळाचा हुरूप वाढल्याचे मंडळाचे प्रमुख रुपेश नाईक यांनी सांगितले.

गोव्यात दिवाळीला भले मोठे नरकासूर बनववून त्याचे दहन करण्याची परंपरा आहे. गावागावात सध्या तरुण मंडळी अवाढव्य आणि आक्राळ विक्राळ नरकासूर बनवण्यात दंग असताना या मंडळाने मात्र वेगळी वाट चोखाळत 40 फूटी आकाश कंदील साकारला आहे.

विशेष म्हणजे हा आकाश कंदील एका चर्च समोर उभारण्यात आला आहे. सर्वधर्मीय लोक त्यात सहभागी होत असल्याने त्यातून राष्ट्रीय एकात्मता देखील वाढीस लागत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत