गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी!

लेनची शिस्त न पाळणाऱ्या वाहन चालकांमुळे होते वाहन कोंडी!

महाड : रायगड माझा वृत्त

गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव शहराच्या अलिकडे व पलिकडे, लेनची शिस्त न पाळणाऱ्या वाहन चालकांमुळे शनिवारी (ता. 5 मे ) सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. माणगांव शहराच्या अलिकडे व पलीकडे  किमान तिन किमी अंतरा पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. जागा मिळेल तेथून बेदरकारपणे ओव्हरटेक करत, एका गाडीला तिन-तिन गाड्या समांतर महामागार्वर उभ्या राहात असल्याने ही वाहतूक कोंडी होत होती.

जेमतेम २ किमी. अंतराकरीता १ तास २० मि. वेळ लागत होता. केवळ लेनची शिस्त सगळ्यांनी पाळली तर वाहतूक एकदम सुरळीत राहील, परंतु या मानसिकतेत येथे कोणताही वाहन चालक दिसून येत नसल्याचे दिसत होते. वाहतूक पोलिंसांची संख्या मर्यादीत आहे, परंतु आहेत ते चार पोलीस भर उन्हात वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करित आहेत. दर ५०० मिटर वर वाहतूक पोलीस ठेवणे केवळ अशक्य आहे. वाहन चालकांनी बेदरकारपणे वाहतूकीची शिस्त न पाळता गाड्या चालवायच्या आणि वाहन कोंडी झाली म्हणून वाहतूक पोलिसांना जबाबदार धरायचे हे चालकांचे नेहमीचे झाले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत