गोविंदबागेत मराठा आंदोलकांचे ठिय्या आंदोलन!

बारामती : रायगड माझा वृत्त 

क्रांती दिनाचं औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा आंदोलकांनी बंद पुकारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीमधील गोविंदबाग या निवासस्थानाबाहेरही आंदोलकांचा ठिय्या सुरु आहे.

मराठा आंदोलक आज सकाळी नऊ वाजताच गोविंदबागबाहेर जमा झाले आणि त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. आंदोलकांच्या ठिय्यामुळे पवारांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काही वेळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार घराबाहेर आले आणि ते देखील आंदोलकांसोबत घोषणाबाजी देऊ लागले. पवार कुटुंबीयांपैकी सध्या अजित पवारच गोविंदबागमध्ये आहेत.दरम्यान, याआधी आठ वर्षांपूर्वी ऊस आंदोलनादरम्यान आंदोलकांनी शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं केली होती. त्यानंतर आज पवारांच्या घराबाहेर ठिय्या देण्यात आला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत