गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुन्हा मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल

मुंबई  : रायगड माझा वृत्त

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पुन्हा एकदा मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळीच त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तातडीने ते मुंबईत दाखल झाले. त्यांना जास्तच त्रास होत असल्यामुळे गोव्यातले भाजपाचे काही आमदारही त्यांना सोडण्यासाठी मुंबईत आल्याची माहितीही समोर येत आहे.

काही महिन्यांपूर्वी त्यांची प्रकृती मोठ्या प्रमाणावर खालावली होती. त्यासाठी त्यांनी आधी मुंबईत आणि नंतर अमेरिकेत ११ दिवस उपचार घेतले होते. अमेरिकेत उपचार घेतल्यानंतर नुकतेच ते गोव्यात परतले होते. त्यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली होती.

गेल्या काही महिन्यांपासून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर स्वादुपिंडाच्या आजारावर उपचार सुरू आहेत. यासाठी आधी गोव्यातील मेडिकल कॉलेज, नंतर मुंबईतील लिलावती आणि शेवटी अमेरिकेत त्यांच्यावर उपचार सुरू होते. मार्च महिन्यामध्ये पर्रीकर अमेरिकेतील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले होते. तब्बल ३ महिने उपचार झाल्यानंतर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते गोव्यात परतले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत