गोव्यात नेतृत्व बदलावरुन भाजपमध्ये ३ गट

 

रायगड माझा वृत्त

पणजी : गोव्यात तूर्तास नेतृत्वात बदल होणार नाही. पण नेतृत्वावरून गोवा भाजपमध्येच तीन गट असल्याचं दिसून येतं आहे. या पार्श्वभूमीवर आज गोवा भाजप कोअर कमिटीची बैठक आहे. सकाळी साडेनऊ वाजता प्रदेश कार्यालयात ही बैठक होणार आहे. भाजप आमदार, मंत्री आणि सरकारला पाठिंबा देणाऱे घटक पक्ष, अपक्ष आमदारांशी संवाद साधल्यावर केंद्रीय निरीक्षक कोअर कमिटी सदस्यांशी चर्चा करणार आहेत.

केंद्रीय निरीक्षक आज दुपारी दिल्लीला परतणार आहेत. दोन दिवसांत आपला अहवाल भाजप केंद्रीय पक्ष श्रेष्ठींना सादर करणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत