गोव्यात प्रियकरासमोरच तरुणीवर सामूहिक बलात्कार

पणजी : रायगड माझा 

गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर एका तरुणीवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीच्या प्रियकरासमोरच हे कृत्य केले. दक्षिण गोवा येथील एका समुद्र किनाऱ्यावर प्रेमी युगूल संध्याकाळी गप्पा मारत बसले होते. यादरम्यान तीन तरुण तिथे पोहोचले. त्या तिघांनी त्या युगूलाला हटकले. यानंतर त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. तिघांनी त्या युगूलाला मारहाण केली, तसेच त्यांना विवस्त्र करुन त्यांचे छायाचित्र देखील काढले. यानंतर त्या तिघांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.

पोलीस अधीक्षक अरविंद गवस यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. आम्ही या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पीडित तरुणीची वैद्यकीय चाचणी झाली आहे. नराधमांचा शोध सुरु असून संशयितांची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत