गौतम गंभीरचा स्तुत्य उपक्रम; अवघ्या एक रुपयांत जेवणाची सोय

महाराष्ट्र News 24

लॉकडाउन काळातही गंभीरने आपल्या संस्थेच्या माध्यमातून अनेक मजुरांची मदत केली. यानंतर गौतम गंभीरने आणखी एक कौतुकास्पद पाऊल टाकलं आहे. गंभीरनं आपल्या पूर्व दिल्ली मतदार संघात अवघ्या एक रुपयांत जेवणाची सोय केली आहे. या उपक्रमाला गंभीरनं ‘जन रसोई’ असं नाव दिलं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने राजकारणाच्या क्षेत्रात पाऊल टाकलं. पूर्व दिल्ली लोकसभा मतदार संघातून भाजपाच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडूनही आला. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर गौतम गंभीर सोशल मीडियावर केंद्र सरकारच्या धोरणांचं कौतुक करण्यास नेहमी पुढे असतो. गेल्या काही वर्षांपासून सामाजिक कार्य सुरुच ठेवलं आहे.

मंगळवारी गौतम गंभीरनं आपल्या मतदार संघातील गांधी नगर परिसरात जन रसोईच्या पहिल्या शाखेचं उद्घाटन केलं आहे. २६ जानेवारी रोजी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अशोक नगर येथे दुशऱ्या शाखेचं उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती गौतम गंभीरच्या कार्यालयानं दिली आहे. येथील कँटिनची क्षमता १०० माणसांची आहे, पण करोना नियमांमुळे एका वेळी फक्त ५० लोकांनाच याचा लाभ घेता येणार आहे. जेवणात भात, मसूरची डाळ आणि भाजी असा आहार असणार आहे.

पूर्व दिल्लीतील आपल्या मतदार संघात म्हणजेच १० विधानसभा मतदार संघात कमीत कमी एक ‘जन रसोई’ उघडण्याचा गंभीरचा माणस आहे. कोणत्याही जाती, धर्म आणि पंथाच्या व्यक्तिला निरोगी आणि आरोग्यदायी जेवण मिळायलाच हवं, तो प्रत्येकाचा हक्कच आहे, असे मला वाटते. बेघर आणि निराधार लोकांना दोन वेळचं जेवणही मिळत नसल्याचे पाहून वाईट वाटते, असे गंभीर म्हणाला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत