ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचे अभूतपूर्व यश

महाराष्ट्र News 24

राज्यात झालेल्या ग्रामपंचात निवडणुकींचे निकाल काल हाती आल्यानंतरमहाविकास आघाडीनेच बाजी मारल्याचा दावाही करण्यात येत आहे. मात्र ग्रामपंचायतीच्या या संपूर्ण निकालात मनसेनेही स्वत:कडं लक्ष वेधून घेतलं आहे.

मनसेन ग्रामपंचायत निवडणुकीत ताकद लावल्याचं दिसत आहे. कारण मनसेनं मुंबईजवळची ग्रामपंचायत असो की तिकडे विदर्भ, आपलं अस्तित्व दाखवून दिलं आहे. 35 ग्रामपंचायतीमध्ये मनसेने विजयी पताका फडकवलेली आहे. ग्रामपंचायतीच्या या यशानंतर मनसेकडूनही आता प्रतिक्रिया आली आहे. मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी फेसबुकद्वारे निवडून आलेल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन केले आहे. अनिल शिदोरे म्हणाले की, “ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल ऐकताना पाय जमिनीवर आहेत असं वाटतं. परिस्थितीबरोबर आपली नाळ जुळल्याचं जाणवतं. काहीतरी आपल्या आवाक्यातलं, आपल्या जगण्यातलं असल्यागत वाटतं. लोकशाहीचं खरं रूप भेटल्याचा आनंद होतो.”

दरम्यान, यवतमाळमध्ये 15 , जिगाव ग्रामपंचायत 7 जागांवर मनसेने विजय मिळवला आहे. औरंगाबादच्या रेणापूरमध्ये 6, अमरावतीतील अचलपूर तालुक्यात खैरी सावंगी वाढोवा ग्रामपंचायतीत मनसेचे 7 जागांवर मनसेनं विजय मिळवला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत