ग्रामीण तरुणाईचे भविष्य धोक्यात येण्याची संभाव्य शक्यता

खोपोली : समाधान दिसले

सर्व ठिकाणी रात्र नी दिवस तरुणाईमध्ये जी चर्चा चालते, ती म्हणजे फक्त क्रिकेट खेळाचीच. कारण की दहा बारा वर्षाच्या मुलांपासून मोठंमोठ्या तरुणाईला क्रिकेटचे इतके वेड लागलंय की मुलांचे अभ्यासावर काही लक्ष राहिले नाही. ह्या क्रिकेटच्या नादामध्ये तरुणाई आपल्या भविष्याचे वाटोळे करतोय की काय हा ? प्रश्न उभा राहीला असुन याचे भान त्यांना राहिले नाही. दिवस रात्र जर क्रिकेटचीच चर्चा असेल तर अभ्यासात मन लागेलच कसे. यावर काही बंधन ठेवायला पाहिजे. नाहीतर ग्रामीण क्रिकेट तरुणाईला बरबाद होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. भविष्यात हा खेळ तरुणाई भीक मागायला लावणार अशी प्रतिक्रिया काही जाणकार व्यक्ती व्यक्त करीत आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर काही बंधने करणे गरजेचे आहे, नाहीतर आपल्या पाल्यांवर भविष्यात मोठी हानी पोहचू शकते. म्हणून तरुणांनी आपली काळजी घेण्याची गरजेचे आहे.

कमीत कमी प्रत्येक पालक वर्गाने आपल्या मुलाला तरी क्रिकेट खेळासारख्या ब्रम्हराक्षसापासुन दुर ठेवायला पाहिजे, कारण की छोटी छोटी मुलं क्रिकेट खेळाच्या नावाने शाळेत जात नाहीत. शाळेत चाललो म्हणून सरळ क्रिकेट बघायला जातात. आणि पालकांना पण कुठला टाइम असतो, की ते शाळेत जावून आपल्या पाल्यांची चौकशी करतील. त्यामुळे कमीत कमी राजकारण्यांनी पण ही आपली स्वतःची जबाबदारी समजून कोणीही क्रिकेटला पैसे मागायला आले तर देऊ नका आणि स्वतः पण क्रिकेटचे सामने ठेऊ नका. येणाऱ्या पिढीला सुधारण्यासाठी हातभार लावा ही जबाबदारी प्रत्येकाची आहे. तरच आपली मुलं आणि या पुढची पिढी काहीतरी उज्वल भविष्य करु शकेल. नाहीतर येणाऱ्या काळात आपली मुलं फक्त लेबर वर्कर म्हणूनच दिसतील. म्हणून एक सुजाण नागरिक म्हणून नवीन पिढी घडविण्यासाठी संकल्प करा आणि या क्रिकेटच्या महा राक्षसाला दूर ठेवा यातच आपलं भविष्य आहे.

पावसाळा संपला की ग्रामीण भागातील बहुतांशी तरुणांना वेड लागतात ते क्रिकेट खेळाचे. अगदी अॉक्टोबर महिन्यापासुन सुरू झालेला हा क्रिकेटचा हंगाम फेब्रुवारी, मार्च महिन्यापर्यत जोरदार चालतो. या क्रिकेट खेळामुळे ग्रामीण भागातील तरुणांनी सावधानता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे, असे न झाल्यास भविष्यात हा ग्रामीण भागातील तरुण वर्ग हताश होईल अशी चिंतेची भावना खुद्द जाणकार व पालक वर्गातून व्यक्त होत आहे. क्रिकेट हा तसा महागडा व परदेशी खेळ. मात्र या खेळाचे भारतातील ग्रामीण भागातील तरुणाईला वेड लागल्याने या क्रिकेट खेळामुळे शालेय आणि महाविदयालयीन विद्यार्थ्यांना फार मोठा फटका बसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

परंतु कोण आवर घालणार या वेडाला ? रात्र नी दिवस तरुणांमध्ये जी चर्चा चालते ती फक्त नी फक्त क्रिकेटचीच. अगदी दहा बारा वर्षापासुन मुलांना क्रिकेटचे इतके वेड लागलंय की मुलांचे अभ्यासावर लक्ष राहिले नाही. यामुळे शाळा – महाविदयालय शिक्षणात मागे पडत आहेत. ग्रामीण क्रिकेटच्या नादामध्ये आपण आपल्या भविष्याचे वाटोळे करतोय याचे भान आताच्या तरुणाईला राहिलेले नाही. दिवस ना रात्र जर क्रिकेटचीच चर्चा असेल अभ्यासात मग लागेलच कसे ? यावर बंधन ठेवायला पाहिजे, नाहीतर येणाऱ्या पिढीला भविष्यात बरबाद होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. कमीतकमी प्रत्येकाने आपल्या मुलाला क्रिकेटपासून दूर ठेवावे अशी अपेक्षा चिंताग्रस्त पालक वर्ग व जाणकार व्यक्त करीत आहेत.

बरीचशी मुले घरी असे सांगत शाळेत व महाविद्यालयात चाललो म्हणून सरळ क्रिकेट बाघायला, खेळायला जातात आणि आपले शैक्षणिक नुकसान करतात. त्यामुळे कमीतकमी राजकीय पुढारी वर्गानी आपली स्वतःची जबाबदारी समजून कोणीही क्रिकेटला पैसे मागायला आले तर देऊ नका आणि स्वतःपण क्रिकेटचे सामने ठेवू नका, येणाऱ्या पिढीला सुधारण्यासाठी हातभार लावा अशी आर्त साद पालक वर्गातुन ऐकू येत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत