ग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिलासा : 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू.

नेरळ-अजय गायकवाड
कर्जत शहरात लसीकरणाचा सावळा गोंधळ सुरू असताना तालुक्यातील ग्रामीण भागातील 22 आरोग्य उप केंद्रांवर लसीकरण सुरू करून पावणे तीन हजार लोकांचे लसीकरण करण्यात आले. या केंद्रांवर कोविशिल्ड लस देण्यात येत असून 45 वर्षांच्या वरील व्यक्तींसाठी उपलब्ध आहे.


कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची सहा प्राथमिक आणि 38 आरोग्य उपकेंद्र आहेत. मात्र 22 आरोग्य उप केंद्रांवर आरोग्य समुदाय अधिकारी असल्याने त्या केंद्रांना लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली. या आरोग्य उपकेंद्रांसाठी दोन हजार सातशे पन्नास कोविशिल्ड लस उपलब्ध झाल्याने त्या – त्या भागातील लोकांचे लसीकरण झाले. या केंद्रांवर 45 वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण करण्यात येत असल्याने 18 ते 44 वयोगटातील व्यक्ती लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत.एकंदरीत शहरापेक्षा ग्रामीण भागात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आल्याने ग्रामीण भागातील लोकांना चांगली सुविधा मिळाली आहे. यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य, शिक्षण व क्रीडा सभापती सुधाकर परशुराम घारे यांचे प्रयत्न कामी आले.काही भागात  दोन – अडीच किलोमीटर वर लसीकरण केंद्र असल्याने त्या परिसरातील ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहेत. उदा. मोहिली आरोग्य केंद्रापासून खांडपे केवळ अडीच किलोमीटरवर आहे. आता या केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना लसीची प्रतीक्षा आहे.

ग्रामीण भागातील आरोग्य उप केंद्रांना लसीकरणाची परवानगी दिल्याने त्या – त्या भागातील लोकांना लसीकरण करणे सोयीचे झाले आहे. सध्या 45 वर्षांवरील व्यक्तींना कोविशिल्ड लस देण्यात येते. पुढील आदेश मिळाल्यानंतर 18 ते 44 वर्षांच्या व्यक्तींना लसीकरण करता येईल.’
-डॉ. सी. पी. मोरे, तालुका आरोग्य अधिकारी कर्जत

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत