ग्‍लोबल वॉर्मिंगमुळे मुंबई बुडण्‍याचा धोका, नासाने दिला इशारा !

( रायगड माझा ऑनलाईन टीम )
 
मुंबई- हिमनग आणि पृथ्‍वीवरील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळत असल्‍यामुळे भारतातील मुंबई हे शहर पुढील 100 वर्षांत डुबण्‍याचा धोका आहे, अशी माहिती नासाने दिली आहे. ‘सायन्‍य’ या मासिकात नासाचा हा निष्‍कर्ष प्रकाशित करण्‍यात आला आहे. यामध्‍ये जगभरातील धोकादायक शहरांची यादी प्रसिद्ध करण्‍यात आली आहे.
 
यादीत भारताच्‍या दोन शहरांचा समावेश
धोकादायक शहरांच्‍या यादीमध्‍ये भारताच्‍या दोन शहरांचा समावेश आहे. दुसरे शहर आहे कर्नाटकातील मंगळूर. नासाच्‍या रिपोर्टनूसार आगामी 100 वर्षांत मुंबईच्‍या समुद्र पातळीत 15.26 से.मी. आणि मंगरुळच्या समुद्र पातळीत 15.98 से.मी.ने वाढ होणार आहे. मंगरुळला मुंबईपेक्षा जात धोका असल्‍याचे नासाने म्‍हटले आहे.
 
आगामी आपत्‍ती ओळखण्‍यासाठी नासाने विकसीत केले टूल
ग्‍लोबल वॉर्मिंगमुळे येणा-या काळात काय काय धोके उत्‍पन्‍न होऊ शकतात याचा अंदाज यावा म्‍हणून नासाने ‘ग्रॅडिएंट फिंगरप्रिंट मॅपिंग (जीएफएस)’ हे टूल विकसीत केले आहे. नासाच्‍या संशोधकांनी 293 शहरांचा या टूलद्वारे अभ्‍यास करुन आपला निष्‍कर्ष प्रसिद्ध केला आहे. त्‍यामुळे ग्‍लोबल वॉर्मिंगची आपण लगेच दखल घेऊन ते थांबवण्‍यासाठी उपाययोजना राबवल्‍या पाहिजेत, असे नासाने म्‍हटले आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत