घारापुरी बेटावर आज पहिल्यांदाच पोहचणार वीज!

रायगड माझा ऑनलाईन

देशाच्या स्वातंत्र्यानंतर आज पहिल्यांदा मुंबई जवळच्या घारापुरी बेटावर वीज येणार आहे. घारापुरी बेटावरील हजारहून अधिक कुटुंब गेली ७० वर्षे दिवा बत्ती वरच आपलं जीवन जगत होती. पण त्यांच्या आयुष्यात आता प्रकाश पडणार आहे असंच म्हणावं लागेल. इतक्या वर्षांनंतर त्यांच्या जीवनातला अंधाक दूर होणार आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच समुद्र तळातून केबल टाकून वीज पोहचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

घारापुरी बेटावर आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या वीज प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे. जवळच्याच नाव्हा-शेव्हा बंदरातून विजेची केबल समुद्राखालून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या घारापुरी बेटावर पोहचवण्यात आली आहे. त्यामुळे दरवर्षी १४ लाखाहून अधिक पर्यटक येणाऱ्या या बेटावर पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

घारापुरी बेटाच्या विद्युतीकरणाचा लोकार्पण सोहळा आज संध्याकाळी वाजता घारापुरी बेटावर आयोजित करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते होणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत