‘घूमर’ गाण्यातही होणार बदल

रायगड माझा

बहूचर्चित चित्रपट ‘पद्मावत’चा प्रदर्शनाचा मार्ग हळूहळू मोकळा होत आहे. चित्रपटाचे नाव बदलल्यानंतर आता ‘घूमर’ गाण्यातही सेन्सॉर बोर्डाने काही बदल सूचवले आहेत. या  गाण्यात अभिनेत्री दीपिका पदूकोणचे पोट आणि कंबर दिसत असल्यामुळे सेन्सॉर बोर्डाने गाण्यावर आक्षेप घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गाण्यामध्ये जिथे जिथे दीपिकाचे अंग प्रदर्शन होत आहे, ते दृष्य चित्रपटातून काढून टाकण्याचे आदेश सेन्सॉर बोर्डाने दिले आहेत. करणी सेनेने या आधीही राजपूत स्त्रीया अश्याप्रकारे नृत्य करत नाहीत, असे म्हणत गाण्यावर आक्षेप घेतला होता. संगणकावर ग्राफिक्सच्या मदतीने हे गाणे एडिट केले जात असून दीपिकाचे पोट दिसणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर या गाण्यात बदल केल्यानंतर पुन्हा एकदा हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत