घोडेस्वारीमध्ये दोन पदके, सायनाचे पदक निश्चित

 

रायगड माझा वृत्त 

जकार्ता– इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या १८ व्या आशियाई स्पर्धेत आज रविवारी भारताच्या खात्यात आणखी एका पदकांची भर पडली आहे. घोडेस्वारी या क्रीडाप्रकारात भारताच्या फवाद मिर्झा याने वायौक्तिक रौप्यपदक पटकाविले होते.

त्यानंतर भारताला घोडेस्वारी क्रीडाप्रकारात सांघिक स्पर्धेतही भारतीय संघाने रौप्यपदक आपल्या नावे केले आहे.  या संघामध्ये फवाद मिर्झा, राकेश  कुमार, आशिष मलिकआणि जितेंदर सिंग यांचा समावेश आहे.

सायना नेहवाल हिने आपला उपांत्यपूर्वफेरीचा सामना जिंकून उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. तिने हा सामना २१-१८,२१- १६ असा जिंकत थायलंडच्या खेळाडूचे पदक जिंकण्याचे स्वप्न उधळून लावले आहे. या विजयासह भारताचे आणखी एक पदक निश्चित झाले आहे.

आतापर्यंत आशियाई स्पर्धा २०१८ मध्ये भारताने ३१ पदके जिंकली आहेत. यामध्ये ७ सुवर्णपदक,  ७ रौप्यपदक आणि १७ कांस्यपदक यांचा समावेश आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत