घोणसे घाटात एसटी आणि ट्रेलरची धडक : चालक, महिला वाहक सहीत एक महिला प्रवासी जखमी

म्हसळा : निकेश कोकचा

म्हसळा माणगाव रस्त्यावर असणाऱ्या घोणसे घाटामध्ये समोरून भरधाव येणाऱ्या ट्रेलरने एसटी बसला धडक दिल्याची घटना सोमवार दि ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास घडली. या धडकेमध्ये चालक, महिला वाहक व एक महिला प्रवासी जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

 

 

श्रीवर्धन आगारामधुन दुपारी सुटणारी श्रीवर्धन माणगाव एमएच २० बिएल २८११ या क्रमांकाची बस चालक सुधाकर पालकर हे माणगावच्या दिशेने न्हेत असताना मार्गामध्ये असणाऱ्या घोणसे घाटात बस आल्यानंतर माणगावच्या दिशेने म्हसळया कडे येणाऱ्या दिघी पोर्ट मधिल लोह वाहतूक करणारा ट्रेलर क्र.एमएच ४६ बीबी ८३२७ चा चालक विरूदध् दिशेने येउन बसवर अचानक धडकला. बस चालकाच्या हुशारीमुळे अपघाताची तिव्रता काही प्रमाणात कमी झाल्याने बसमध्ये असणाऱ्या आठ ते दहा प्रवाशांचे प्राण वाचवता आले. मात्र चालक रघूनाथ पालकर याच्या पायाला दुखापत झाली असून महिला वाहक आर.एम. धायगुडे व एक महिला प्रवासी जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. या अपघाताची माहिती माणगाव पोलिस ठाण्यात तत्काळ देण्यात आली असली तरी सायंकाळ पर्यत पोलिस घटणा स्थळापर्यंत पोहचू शकले नाहीत.

काही दिवसाआधीच उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीवर्धन, म्हसळा तहसिलदार व म्हसळा पोलिस स्टेशन यांना दिधी पोर्ट मधून होणाऱ्या जिवघेण्या वाहतूक बंद करण्याबाबत शिवसेना, युवा सेना व वाहतूक सेना यांच्या मार्फत निवेदन दिले आहे. प्रशासनाने यावर वेळेत योग्य कारवाईन केल्यास येत्या १५ ऑगस्ट रोजी प्रशासना विरुद्ध म्हसळ्यामध्ये चक्काजाम आंदोलन करू, या आंदोलनाची जबाबदारी सर्वस्व प्रशासनाची राहिल.

रवी लाड माजी सभापती तथा संघटक शिवसेना श्रीवर्धन विधानसभा

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत