घोळ माशाच्या ‘बोथ’ला साडे पाच लाखांचा भाव

मनोर : रायगड माझा वृत्त 

पालघर तालुक्यातील समुद्रकिनार्‍यावरील मुरबे गावातील एका मच्छीमाराच्या जाळ्यात सापडलेल्या घोळ माशाची  720 ग्रामची बोथ (फुप्फुसांची पिशवी) व्यापार्‍याने चक्क 5 लाख 59 हजार रुपये मोजून खरेदी केली आहे. आतापर्यंत सर्वाधिक दराने खरेदी करण्यात आलेले हे बोथ ठरले आहे. त्याची सध्या सोशल मीडियावर जबर चर्चा रंगली आहे.

सातपाटी, मुरबे, डहाणू, केळवे आदी बंदरात घोळ, दाढे हे मासे पकडण्यासाठी वागरा या पद्धतीच्या जाळ्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मासे पकडण्यासाठी गेलेल्या श्री साई लक्ष्मी या बोटमालकाच्या बोटीच्या जाळ्यात हा घोळ मासा आला. दाढा, घोळ या माशाच्या मांसापेक्षा त्यांच्या पोटातील बोथाला खूप चांगला भाव व्यापारी देतात.

वाम, कोत, शिंगाळा आदी माशांच्या बोथालाही चांगली मागणी असून उत्तर प्रदेश, बिहार राज्यांतून जिल्ह्यात स्थायिक झालेल्या व्यापार्‍यांकडून हे बोथ खरेदी केले जातात. घोळ माशाच्या मांसाला 800 ते 1 हजार रुपये प्रतिकिलो दर मिळत असला, तरी नर जातीच्या बोथाला सर्वाधिक मागणी असून मादी जातीच्या बोथास 5 ते 10 हजारांपर्यंत किंमत मिळते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत