चंद्रकांत पाटलांना शेतकऱ्यांनी दाखविले काळे झेंडे

 

राहुरी : रायगड माझा वृत्त 

शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्यास झालेला विलंब तसेच दुष्काळ जाहीर करण्याबाबत चालढकल केली जात असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱयांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला.

मंत्री पाटील भाषणाला उभे राहताच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध केल्याने कार्यक्रमाच्या आयोजकांसह पोलीस आणि प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. अखेर पोलिसांनी निषेध करणाऱया तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पुढील कार्यक्रम पार पडला. या कार्यकर्त्यांवर शांतताभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील 172 तालुक्यांवर दुष्काळाचे संकट उभे ठाकले असून शेतमालाला भाव न मिळाल्यास सरकार तो खरेदी करून शेतकऱयांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत