चंद्रकांत पाटलाचे बालिश राजकारण; धनंजय मुंडेंची जहरी टीका

रायगड माझा वृत्त 

धनंजय मुंडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे. एकीकडे आमदार संपर्कात असल्याचे चंद्रकांत पाटील दावा करतात, पण गेल्या 5 वर्षांत एकाही मतदारसंघात आपल्याला उमेदवार मिळत नाही हे कबुल करा. शरद पवारांवर टीका करण्याचा बालिशपणा चंद्रकात पाटलांनी सोडून द्यावा असं म्हणत धनंजय मुंडेंनी चंद्रकात पाटलांना टोला लगावला.

पवार साहेबांवर टीका केल्याशिवाय माणूस मोठा होत नाही; त्यामुळे चंद्रकांत पाटील पवार साहेबांवर टीका करून राजकारणामध्ये मोठे होण्याचा बालीशपणा करीत आहेत. चंद्रकांत पाटलांच्या कोण कोण संपर्कात आहेत हे आम्हाला माहित नाही; पण लोकसभेच्या यशानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये राजकीय मस्ती पाहायला मिळत असून फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत