चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

चंद्रपूर : रायगड माझा ऑनलाईन 

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात पीक राखणीसाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. या शेतकऱ्याच्या मानेकडच्या भागाची वाघाने चिरफाड केली असून त्यांचा रक्तबंबाळ मृतदेह गावकऱ्यांना आढळून आला आहे.

देवराज जीवतोडे (58) असे त्या शेतकऱ्याचे नाव असून ते रात्री पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतावर गेले होते. शेतातील मचाणीवर रात्रभर ते बसून होते. पहाटे जेव्हा घरी जाण्यासाठी ते मचाणीवरून खाली उतरले त्यावेळी दबा धरून बससलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गावातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत