चंद्रपूर: जनावर तस्करांनी पोलिसाला चिरडलं

नागपूर: रायगड माझा वृत्त

नागपूर-चंद्रपूर महामार्गावर खांबाडा तपासणी नाका येथे जनावरांची तस्करी करणाऱ्यांनी पोलीस शिपायाला वाहनाखाली चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात पोलीस शिपाई प्रकाश मेश्राम यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

चंद्रपूरमध्ये नोव्हेंबरमध्ये दारू माफियांनी पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांची वाहनाखाली चिरडून हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेला दोन महिने उलटत नाही तोच जनावर तस्करांनी पोलिसाला चिरडल्याची घटना नागपूर-चंद्रपूर महामार्गावर खंबाडा तपासणी नाका येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरून जनावरांची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वाहनांची तपासणी सुरू केली. तस्करांचे वाहन खांबाडा तपासणी नाक्यावर आले असता, तेथील तैनात पोलिसांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तस्करांनी कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई प्रकाश मेश्राम यांच्या अंगावर वाहन घातले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत