चंद्रभागेच्या पात्रात चार भाविक वाहून गेले, एकाचा मृत्यू

पंढरपूर : रायगड माझा वृत्त 

चंद्रभागेत स्थान करण्यासाठी गेलेल चार मित्र बुडाले, एकाचा मृत्यू

पंढरपूर चंद्रभागेच्या पात्रामध्ये आज सकाळी जळगाव येथील चार भाविक वाहून गेल्याची घटना घडली आहे. यामधील तीन भाविकांना वाचवण्यात होडी वाल्यांना यश आलेय, मात्र राहुल रविंद्र काथार(वय- २५ रा. जळगाव )याचा बुडून मृत्यू झाला आहे.

जळगाव येथील हे भाविक चंद्रभागेच्या स्नानासाठी पात्रात उतरले होते. पण उजनी धरणातून पात्रात पाणी सोडल्याने नदीला पूर सदृश्य परिस्थिती आहे. या वाहत्या पात्रात  नितिन दत्तू कुबर (वय-२२), राजेंद्र अशोक सोनार (वय-२२), भरत रविंद्र काथार (वय-२२), आणि त्याचा मोठा भाऊ राहुल रविंद्र काथार असे चौघे चंद्रभागेत स्नानासाठी गेले होते. पण पाण्याचा अंदाज न आल्याने हे चौघेही पाण्यात वाहून गेले आहे.

आजुबाजुच्या कोळी लोकांनी त्यांना पाण्यात बुडताना पाहिलं आणि त्यांनी बोटीच्या मदतीने तिघांना वाचवलं. पण राहूलचा दुर्देवाने पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. नदीपात्रातून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. घटनेचा माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून राहुलचा मृतदेह सध्य़ा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

पण दरम्यान, गेल्या आठ दिवसांमध्ये कर्नाटकातील लखन टोंपे तसेच मंगळवारी मंगळवेढ्याचे सचिन बिराजदार आणि आज जळगावच्या राहुलचा मृत्यू झाला आहे. या तिघांच्या मृत्यूच्या निमित्ताने चंद्रभागा तटावरील भाविकांचे आपत्कालीन परिस्थिती बाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत