चक्क लग्नमंडपातच मेडिकल कॅम्प, लग्नापूर्वी डॉक्टर जोडप्याची रुग्ण सेवा

बीड : रायगड माझा 

लग्न हा आयुष्यातील मोठा आणि तितकाच महत्वाचा क्षण. हा क्षण अविस्मरणीय व्हावा, यासाठी अनेक जोडपे नवनवीन शक्कल लढवतात, अनेक संकल्प करतात. बीडमधील जोडप्याने देखील त्यांच्या लग्नाच्या दिवशी एक संकल्प केला. बोहल्यावर चढण्याआधी डॉक्टर असलेल्या वधू-वरांनी वऱ्हाडी मंडळीचे मेडिकल चेकअप केले. लग्न हा फक्त कौटुंबिक सोहळा न ठेवता या जोडप्याने लग्नाच्या दिवशी रुग्ण सेवा केली. सामाजिक भान जपणारा हा लग्नसोहळा सर्वांच्याच आठवणीत राहणारा असाच आहे.

डॉ. रोहिणी जाधव आणि डॉ.  योगेश पडोळ या जोडप्याचे लग्न पार पडले. बाशिंग बांधून दोघेही वधू-वर मंडपात आले. मात्र,  त्यांनी थेट मंडपात न जाता शेजारीच एक शामियाना उभारून चक्क विवाहप्रसंगी आलेल्या वऱ्हाडी मंडळीचे मोफत मेडीकल चेकअप करण्यास सुरुवात केली. हा काय प्रकार होतोय हे पाहून वऱ्हाडी मंडळी थोडा वेळ गोंधळून गेले. मात्र थोड्या वेळातच  वऱ्हाड्यांनी स्वत:हून चेकअप करण्यास सुरुवात केली. दिवसभर तब्बल दीड हजारांच्या जवळपास वऱ्हाडी मंडळींचे चेकअप करण्यात आले. लग्नात लाखो रुपयांची उधळण न करता त्याच पैशातून अशी अनोखी समाजसेवा करून दोन्ही कुटुंबीयांनी समाजसेवेचा वसा जपला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत