चक्रीवादळापेक्षाही कोरोना वादळ मोठे, आधी ते थांबवा; संजय राऊतांनी पुन्हा केंद्राला डिवचले

वादळ येत आणि जात असतं. पण या चक्रीवादळापेक्षाही देशात निर्माण झालेलं कोरोना वादळ मोठं आहे. आधी ते थांबवा. त्यासाठी काम करा, अशा शब्दात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला डिवचले. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना कोरोनावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारला डिवचले. चक्रीवादळ पेक्षाही या देशात जे कोरोनाचे वादळ निर्माण झालं आहे ते थांबवणं गरजेचं आहे. या कोरोनाच्या वादळाने रोज मृत्यूच्या राशी पडत आहेत. ते आधी थांबवलं पाहिजे. बाकीचे वादळ येतात आणि जातात. पण कोरोना वादळाचं काय करणार?, असा सवालही त्यांनी केला. यावेळी लसीकरणाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. लसीकरणा संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये चर्चा सुरू आहेत. लवकरच त्यातून मार्ग निघेल, असं राऊत म्हणाले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे फोन टॅप होत आहेत. त्यावरही त्यांनी मत व्यक्त केलं. देशांमध्ये कोणाचे फोन टायपिंग होत नाही हे सांगा. आमचे देखील झाले आहेत आणि आता देखील होत असतील.
हा आता राजनैतिक मामला झाला आहे. आम्ही त्याला गंभीरतेने घेत नाही. फोन टायपिंग हे विरोधकांना ब्लॅकमेल करण्याचा एक हत्यार आहे. मी नाना पटोले यांना देखील सांगेन घाबरू नका. फोन टायपिंग ही काही मोठी गोष्ट नाही, असं राऊत म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत