चमचमीत जेवणाकडे पाठ फिरवून काँग्रेस नेत्यांची ‘पिठलं भाकरी’ डिप्लोमसी

सातारा : रायगड माझा वृत्त 

काँग्रेसची जनसंपर्क यात्रा सकाळी कराडमधून खटाव तालुक्यातील वडूज कडे मार्गस्थ झाली. वाटेत उंबर्डे गावी जेवणाची सोय करण्यात येणार होती. पण, हा बेत रद्द करत काँग्रेसच्या नेत्यांनी गोपूज परिसरात आंब्याच्या झाडाखाली बसून पिठले, भाकरी, ठेचा आणि दही खाऊन यात्रा वडुजकडे रवाना झाली.

काँग्रेसची जनसंपर्क यात्रा आज सातारा जिल्ह्यात आहे. सकाळी यशवंतराव चव्हाण यांच्या सामधीचे दर्शन घेऊन यात्रा कराडमधून खटाव तालुक्यातील वडुजकडे मार्गस्थ झाली. वाटेत उंबर्डे येथे चमचमीत जेवणाची सोय केली जाणार होती. काँग्रेसच्या नेत्यांनी हा बेत रद्द केला. गोपूज परिसरात एक आंब्याच्या झाडा खाली यात्रा थांबली. येथे जमिनीवर बसून नेत्यांनी येथे पिठले, भाकरी, कांद्याची पात, ठेचा, दही आणि चटणीवर ताव मारला.

यावेळी स्थानिक लोकांशी नेत्यांनी संवाद साधला. त्यानंतर यात्रा वडुजकडे मार्गस्थ झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सतेज पाटील, आनंदराव पाटील, यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत