चमत्कार! समुद्रात बुडून बेपत्ता झालेला तरुण नवव्या दिवशी जिवंत परतला!

नऊ दिवसांपूर्वी मुरूडच्या समुद्रात बुडालेला तरुण जिवंत स्वतःच त्याच्या घरी पोहचलाय. आहे ना हा चमत्कार…

मुरुड : अमूलकुमार जैन

मुरूड तालुक्यातील काशीद समुद्रात गेल्या रविवारी 22 एप्रिल रोजी बुडालेला अमोल दिलीप पाटील हा तब्बल नवव्या दिवशी सुखरूपपणे आपल्या घरी पोहोचला असल्याची माहिती मुरुड पोलिसांना प्राप्त झाली आहे. मात्र गेल्या रविवारी 22 एप्रिल रोजी नेमके काय झाले याचा तपास आता सुरु करण्यात आला असल्याची माहिती मुरुड पोलिसांनी दिली आहे.

अहमद नगर जिल्ह्यातील अमोल पाटील व त्याचा मित्न सतिश ढोके हे दोघेही २२ एप्रिल ला रोजी मुरुड काशीद समुद्र किनारी फिरण्यासाठी आले. समुद्रात पोहण्यासाठी उतरल्यानंतर अमोल पाटील याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो लाटेच्या पाण्यात दिसेनासा झाला होता. तेव्हा पासून भारतीय तटरक्षक दल, मुरुड पोलीस आणि स्थानिक जिवरक्षक ग्रामस्थांनी रविवार पासून त्याचा रायगड जिल्ह्यातील प्रत्येक समुद्रकिनारी शोध घेत होते. ९ दिवस उलटून गेल्यानंतर देखील त्याचा शोध लागला नव्हता. मात्न अचानक सोमवारी ३० एप्रिलच्या दिवशी अमोल पाटील  हा सुखरूपपणे त्याच्या घरी परतला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घरी येताना तो जोरजोरात ओरडत आणि रडत घरी आला असल्याचे त्यांच्या घरच्यांनी सांगितले. अमोल याची मानसिक परिस्थिती बरी नसल्याने त्याला उपचाराची गरज असल्याचे पोलीस सांगत आहेत.  या सर्व पार्श्वभूमीवर अमोलचा मित्र सतिश ढोके यास मुरुड पोलीस ठाण्यात बोलावले असून २२ एप्रिलच्या दिवशी नेमके काय झाले? अमोल नक्की बुडाला होता का? असे अनेक प्रश्न आता समोर येत असून त्या दृष्टीने मुरुड पोलीस तपास करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत