चांदवडमध्ये भीषण अपघात; ३ जागीच ठार

चांदवड (नाशिक) : रायगड माझा ऑनलाईन 

मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड येथील श्री रेणुकामाता मंदिराच्या परिसरात उभ्या असलेल्या बसला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला.

चांदवड येथील श्री रेणुकामाता मंदिराच्या बाजूला बंद पडलेली एसटी बस उभी होती. मागून MH 15 EB 3067 या क्रमांकाची कार भरधाव वेगाने येत होती. भरधाव वेगात असलेल्या या कारचा अचानक टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला आणि या कारने त्याच वेगात बसला धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की कारच्या अर्ध्याहून अधिक भागात बसचा मागील भाग घुसला. कारचे बोनेट आणि छप्पर छिन्नविछिन्न झाले. या अपघातात कारमधील महेंद्रकुमार चंपालाल समदडीया (५०), वंदना महेंद्रकुमार समदडीया (४५) आणि हिमांशू महेंद्रकुमार समदडीया (२०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर हार्दिक महेंद्रकुमार समदडीया अपघातात गंभीर जखमी झाला. महेंद्रकुमारला नाशिकच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत