चांदीचं नाणं चोरी करून मोलकरणीची आत्महत्या

 

 

मुंबई : रायगड माझा 

चोरीचं पितळ उघडं पडून नोकरी धोक्यात आल्यामुळे एका मोलकरणीनं १८ मजली इमारतीतून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ज्योती पाटेकर(१९) असं मृत मोलकरणीच नाव असून तिने त्याच घरात अनेक छोट्या-मोठ्या चोऱ्या केल्या होत्या. घर मालकाकडूनही अनेकदा रंगेहात पकडण्यात आलं होतं. परंतु वेळोवेली समज देऊनही सवयी प्रमाणे ती नेहमी चोऱ्या करायची.

ज्योती ही जोगेश्वरीतील उच्चभ्रू रहिवासी भागात नितिन आणि हिना खन्ना यांच्या घरात मोलकरणीचं काम करत होती. नितिन हे खासगी विमा कंपनीचे प्रमुख म्हणून काम करतात. तर उच्चभ्रू वस्तीत काम करत असल्यानं ज्योतीला घरातून छोट्या-छोट्या वस्तू चोरी करण्याची सवय लागली होती. घर मालकांच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी तिली तसं न करण्यासाठी बजावलं. त्यावर ती माफी मागून वेळ मारून न्यायची. खन्ना यांनी त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त घरात पार्टीचं आयोजन केलं होतं. ज्यात खन्ना यांच्या मुलीला महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या. त्यात एक चांदीचं नाणं देखील भेट म्हणून मिळालं होतं. सोमवारी खूप शोधूनही हिना यांना ते न मिळाल्यांनं हिना यांनी मोलकरणीला विचारलं असता तिनं माहीत नसल्याच सांगितलं. परंतु जेव्हा तिच्या बॅगची झडती घेतली गेली तेव्हा ते चांदीचं नाणं तिच्याच बॅगमध्ये सापडलं. त्यानंतर हिना यांनी तिच्या मावशीला बोलवून सगळी घटना त्यांच्या कानावर घातली. त्यामुळेच नोकरी सुटण्याच्या चिंतेतून रात्री ८.४५वाजता ज्योतीने घराची खिडकी उघडून खिडकीतून इमारतीच्या १८व्या मजल्यावरून उडी मारली.

वरिष्ठ निरीक्षक जगदेव कलापाड यांच्या म्हणण्यानुसार या घटनेनंतर तिला तातडीने रुग्णवाहिकेतून अंधेरीतील होली स्पीरीट रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ती त्यातून वाचू शकली नाही. ते सध्या शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत असून अपघाती मृत्यूचा गुन्हा  दाखल केला गेला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत