चांभार्लीत महिला राज, सरपंचपदी बाळी कातकरी

रायगड माझा :वृत्त

 रसायनीतील चांभार्ली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाळी कातकरी यांची तसेच आघाडीचे पाच सदस्य यांची प्रतिस्पर्धी उमेद्वार नसल्यामुळे बिनविरोध निवड झाली. शिल्लक सहा जागासाठी निवडणुक होणार आहे.

सत्ताविस मे रोजी रसायनीतील वासांबे मोहोपाडा, चांभार्ली, गुळसुंन्दे, वावेघर, तुराडे या ग्रामपंचायतीच्या  निवडणुका होणार आहे. दरम्यान, शनिवार रोजी उमेद्वारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.

 katkari

चांभार्ली ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमाती महिले करिता आरक्षित आहे. सरपंच पदाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेव्दार बाळी सखाराम कातकरी तसेच आघाडीचे विनया सुभाष मुंढे, बाबी दामु कातकरी, राजश्री धनाजी जांभळे, श्रुती सचित कुरंगळे, उर्मीला विणायक ढवळे या पाच सदस्य पदाचे उमेव्दार यांना प्रतिस्पर्धी उमेद्वारर नसल्यामुळे बाळी कातकरी यांची सरपंच पदी  व इतर पाच सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

खालापुर तालुका पंचायत समिति माजी सदस्य दत्तात्रेय जांभळे यांनी याबबात माहिती दिली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत