चाइल्ड हेल्पलाइनला ३ वर्षात ३.४ कोटी कॉल्स

 नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

चाइल्ड हेल्पलाइनला एप्रिल २०१५ पासून यावर्षीच्या मार्च महिन्यांपर्यंत ३.४ कोटींहून अधिक कॉल्स आले आहेत. यामध्ये जवळपास १.३६ कोटी फोन कॉल्स हे सायलेंट कॉल्स होते, अशी माहिती आता समोर आली आहे.

या कॉल्समध्ये बॅकग्राऊंडचा आवाज येत होता. काही वेळा कॉल करणारा शांत बसायचा. त्याला वाटणारी भीती, त्याच्यावर असणारे दडपण, त्याची मानसिकता या सर्वांना झुगारुन त्यानं चाइल्ड हेल्पलाइनला फोन केल्याचे समोर आले आहे. म्हणून या सायलेंट कॉल्सला हेल्पलाइन १०९८ ने फार गंभीरपणे घेतले होते, असे ‘चाइल्डलाईन इंडिया फॉउंडेशन’ च्या हरलीन वालिया यांनी सांगितले. चाइल्ड हेल्पलाइनवर २०१५-१६ मध्ये २७ लाख सायलेंट कॉल आले. २०१६-१७ मध्ये हा आकडा ५५ लाखापर्यंत पोहोचला. तर २०१७-१८ मध्ये हा आकडा ५३ लाख इतका होता, असं वालिया यांनी सांगितलं आहे.
चिमुरडी मुलं ही पहिल्यांदा खूप कमी बोलतात. काउंसलर अशा मुलांना विश्वासात देतात. जे काही आहे ते मोकळेपणाने बोला असं सांगतात. सायलेंट कॉलर्स प्रकरणात असा विश्वास निर्माण करावा लागतो. भावनिक आधारासाठी येणाऱ्या कॉल्सच्या संख्येत सुद्धा वाढ झाल्याचे वालिया यांनी यावेळी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत